मुख्य मजकुरावर जा

Asher

43 वचने · 19 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Aser

Asher चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आशेरच्या गोत्राकडून: मिशाल, अब्दोन,

  2. आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही.

  3. गिलआद यार्देनेपलीकडे राहिला, पण दान आपल्या जहाजांपाशीच का राहिला? आशेर सागरकिनारीच राहिला आणि खाडीतील त्याच्या सुरक्षित स्थळी राहिला.

  4. त्याने मनश्शेह, आशेर, जबुलून आणि नफतालीकडे दूत पाठवून त्यांच्या सैन्यांना येण्याचे आव्हान केले व त्या सर्वांनी त्याला साथ दिली.

  5. तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.

  6. हूशाईचा पुत्र बआना आशेर आणि बालोथवर;

  7. दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.

  8. गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.

  9. आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,

  10. आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह.

  11. आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.

  12. आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000;

  13. तरीसुद्धा आशेर, मनश्शेह आणि जबुलून येथील काही लोकांनी स्वतःला नम्र केले आणि ते यरुशलेमला गेले.

  14. दानच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा आशेरचा एक भाग असेल.

  15. आशेरच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा नफतालीचा एक भाग असेल.

  16. पश्चिमेची बाजू जिची लांबी चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: गादचे द्वार, आशेरचे द्वार आणि नफतालीचे द्वार.

  17. त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.

  18. आशेर वंशातून 12,000; नफताली वंशातून 12,000; मनश्शेह वंशातून 12,000;