मुख्य मजकुरावर जा

Women बद्दल बायबलमधील वचने

304 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.

  2. ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे.

  3. चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ!

  4. कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत;

  5. त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत.

  6. तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले.

  7. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  8. तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे.

  9. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या.

  10. तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.

  11. कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे.

  12. तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे.

  13. दयाळू अंतःकरणाची स्त्री सन्मान संपादन करते, परंतु क्रूर पुरुष केवळ धन संपादन करतो.

  14. विवेकहीन सुंदर स्त्री जणू डुकराच्या नाकातील सोन्याची नथच समजावी.

  15. सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.

  16. सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.

  17. ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.

  18. मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे. आणि भांडखोर पत्नी ही सतत ठिबकणार्‍या गळक्या छप्परासारखी आहे.

  19. पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.

  20. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

  21. भांडकुदळ व सतत टोचून बोलणार्‍या पत्नीबरोबर राहण्यापेक्षा वाळवंटात राहिलेले बरे!

  22. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

  23. भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.

  24. तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्‍याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

  25. “तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही: