मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने

193 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बाबिलोनचे योद्धे युद्ध करण्याचे थांबले आहेत; ते त्यांच्या गडात बसून आहेत. त्यांचे सामर्थ्य संपुष्टात आले आहे; ते दुर्बल झाले आहेत. तिचे आवास जळत आहेत; तिच्या प्रवेशद्वाराच्या सळया मोडल्या आहेत.

  2. सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत, निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक कण्हत आहेत, तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत, आणि तिला अत्यंत पीडा होत आहे.

  3. “याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.

  4. पाहा वृद्ध व तरुण एकत्र रस्त्यांवरील धुळीत पडली आहेत; माझे तरुण व तरुणी शत्रूंच्या तलवारींनी ठार होऊन मरून पडली आहेत. तुमच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही त्यांचा संहार केला; कसलीच दयामाया न दाखविता तुम्ही त्यांचा वध केला.

  5. करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने आपलीच मुले-बाळे शिजविली, जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, ती त्यांचे अन्न बनली.

  6. स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

  7. वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.

  8. “तर आता हे मानवपुत्रा, आपल्यातील कन्या ज्या त्यांच्याच कल्पनेने भविष्य सांगतात, त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग

  9. म्हणून यापुढे तुम्ही खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा शकुन करणार नाही. माझ्या लोकांना मी तुमच्या हातून सोडवेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  10. ओन व पी-बेसेथचे तरुण पुरुष तलवारीने पडतील, आणि शहरे बंदिवासात जातील.

  11. तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. ती ढगांनी झाकली जाईल, आणि तिची गावे बंदिवासात जातील.

  12. शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”

  13. “त्या दिवसात “तहानेने व्याकूळ होऊन सुंदर कुमारी आणि उमदे तरुण निस्तेज होऊन जातील.

  14. तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा— ते सर्व दुर्बल आहेत. तुझ्या देशाच्या वेशी तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत; तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत.

  15. ते सर्व किती अद्भुत व सुंदर असतील! धान्य तरुणांची आणि नवा द्राक्षारस तरुणींची भरभराट करेल.

  16. जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.

  17. “त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाणार्‍या दहा कुमारींसारखे होईल.

  18. त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.

  19. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.

  20. शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले.

  21. ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”

  22. याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही.

  23. ते घर शोक करणार्‍या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”

  24. जात्यावर एकत्र धान्य दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.

  25. तेव्हा एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी आली, येशूंनी तिला म्हटले, “तू मला पाणी प्यावयास देशील का?”