Skip to content

Wine बद्दल बायबलमधील वचने

175 वचने · 83 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग येशू त्यांना म्हणाले, “हे माझ्या कराराचे रक्त आहे व ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे

  2. त्यांनी येशूंना गंधरस मिसळलेला द्राक्षारस दिला, परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.

  3. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.

  4. जुना द्राक्षारस प्याल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस घ्यावासा वाटत नाही. ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारसच उत्तम आहे.’ ”

  5. त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली.

  6. नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा.

  7. मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.”

  8. नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”

  9. भोजन झाल्यानंतर येशूंनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे, जे रक्त पुष्कळांसाठी ओतले जात आहे.

  10. सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला.

  11. ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.”

  12. त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले,

  13. “प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”

  14. येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही.

  15. जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.

  16. कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे.

  17. जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.

  18. तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला.

  19. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.

  20. मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.

  21. यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस.

  22. त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्‍या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्‍या असाव्या;

  23. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”

  24. तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य सर्व राष्ट्रांनी प्राशन केले आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे, आणि जगातील व्यापारी तिच्या भोग विलासी धनामुळे श्रीमंत झाले आहेत.”

  25. तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक.