मुख्य मजकुरावर जा

Wine बद्दल बायबलमधील वचने: Admonitions against the use of

36 वचने · 83 पैलू

Admonitions against the use of बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे,

  2. तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.

  3. तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.

  4. मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.

  5. भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही.

  6. कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे? कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत? कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत?

  7. जे मद्यपानासाठी घुटमळतात, जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात.

  8. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

  9. शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

  10. हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.

  11. असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे.

  12. जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!

  13. धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,

  14. गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!

  15. त्या मुकुटाला धिक्कार असो, जो एफ्राईमच्या दारुड्यांचा अभिमान आहे, त्या फिके पडणार्‍या फुलाला, त्याच्या तेजस्वी सौंदर्याला, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेल्या— त्या नगराला, जो मद्याने क्षीण झालेल्यांचा अभिमान आहे!

  16. तो मुकुट, एफ्राईमच्या मद्यपींचा अभिमान, पायाखाली तुडविला जाईल.

  17. आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात आणि मद्यापासून झोकांड्या देतात: याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. आणि मद्यापासून झोकांड्या देतात ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, निर्णय देताना ते अडखळतात.

  18. संदेष्ट्याविषयी: माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे; माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत. मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे, एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे, कारण याहवेह व त्यांचे पवित्र शब्द.

  19. “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”

  20. त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो.

  21. सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती.

  22. मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो.

  23. परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये.

  24. त्या शिवाय आम्ही कधीही घरे बांधू नयेत, बीज पेरणी करू नये, द्राक्षमळे लावू नयेत; यापैकी कशाचीही मालकी पत्करू नये, तर आम्ही आजीवन तंबूंमध्येच राहावे. तर ज्या भूमीवर आम्ही विमुक्त म्हणून वसती करू, तिथे दीर्घकाळ राहू.

  25. आम्ही आमचा पिता रेखाबचा पुत्र यहोनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आम्ही, आमच्या पत्नींनी, पुत्रांनी वा कन्यांनी कधीही द्राक्षारस प्याला नाही.