Skip to content

Wine बद्दल बायबलमधील वचने: Fermented

8 वचने · 83 पैलू

Fermented बद्दल वचने

  1. “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे,

  2. तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.

  3. त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्‍याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.

  4. त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.

  5. खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.”

  6. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

  7. शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

  8. आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जाईल, द्राक्षारस वाहून जाईल आणि द्राक्षारस व बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.”