Skip to content

Wine बद्दल बायबलमधील वचने

175 वचने · 83 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”

  2. त्याप्रमाणे याजन्याह, यिर्मयाहचा पुत्र, याजन्याहचा नातू, हबसिन्याहचा पुत्र, तो, त्याचे भाऊ व सर्व पुत्र—म्हणजे पूर्ण रेखाबी कुटुंब यांना मी भेटण्यास गेलो.

  3. सर्वांना मी याहवेहच्या मंदिरात आणले व इग्दल्याह, परमेश्वराच्या मनुष्याचा पुत्र, हानानाचे पुत्र जी खोली वापरीत असत, त्या खोलीत त्यांना नेले. ही खोली राजवाड्याचे अधिकारी वापरीत असलेल्या खोलीच्या बाजूस आणि मंदिराचा द्वारपाल शल्लूमचा पुत्र मासेयाह, याच्या खोलीच्या बरोबर वर होती.

  4. मग त्या रेखाबीसमोर मी द्राक्षारसाचे कटोरे व काही पेले ठेवले आणि, “द्राक्षारस प्या,” असे त्यांना म्हणालो.

  5. परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये.

  6. त्या शिवाय आम्ही कधीही घरे बांधू नयेत, बीज पेरणी करू नये, द्राक्षमळे लावू नयेत; यापैकी कशाचीही मालकी पत्करू नये, तर आम्ही आजीवन तंबूंमध्येच राहावे. तर ज्या भूमीवर आम्ही विमुक्त म्हणून वसती करू, तिथे दीर्घकाळ राहू.

  7. आम्ही आमचा पिता रेखाबचा पुत्र यहोनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळल्या आहेत. आम्ही, आमच्या पत्नींनी, पुत्रांनी वा कन्यांनी कधीही द्राक्षारस प्याला नाही.

  8. किंवा राहण्यासाठी घरे बांधली, वा द्राक्षमळे, शेते अथवा पिके घेतली नाहीत.

  9. आम्ही तंबूत राहिलो व आमचा पिता योनादाब याने आम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा तंतोतंत पाळल्या आहेत.

  10. ‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत.

  11. मग यिर्मयाह रेखाबी लोकांच्या कुटुंबाकडे वळून त्यांना म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘तुम्ही तुमचे पूर्वज यहोनादाबचे प्रत्येक बाबतीत आज्ञापालन केले व त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्या.’

  12. म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘रेखाबचा पुत्र योनादाबच्या वंशामध्ये माझी सेवा करणाऱ्यांचा कधीही अभाव होणार नाही.’ ”

  13. मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.”

  14. तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.

  15. “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

  16. जसे याजेर शोक करतो, तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत, त्या याजेरपर्यंत पोहोचतात; संहार करणाऱ्याने तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे.

  17. मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून आनंद व हर्ष लयास गेले आहेत. द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे; हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही. ओरडणे आहे, होय पण ते आनंदाचे नाही.

  18. “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर

  19. आतील अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.

  20. बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्‍यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला.

  21. बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील.

  22. म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली.

  23. द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले.

  24. तिने ओळखले नाही की, तो मीच होतो ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले, ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले; जे त्यांनी बआलसाठी वापरले.

  25. “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.