Skip to content

Wine बद्दल बायबलमधील वचने

175 वचने · 83 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.

  2. तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे.

  3. “इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या.

  4. मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.

  5. भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही.

  6. कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे? कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत? कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत?

  7. जे मद्यपानासाठी घुटमळतात, जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात.

  8. जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

  9. शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

  10. हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.

  11. असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे.

  12. ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या, जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या!

  13. त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या, आणि त्यांच्या क्लेशाचे विस्मरण होऊ द्या.

  14. मी स्वतःला द्राक्षारसाने हर्षित करण्याचा प्रयत्न केला व मूर्खता जवळ करून—तरीही माझे मन मला ज्ञानाने चालवित होते. मनुष्य या पृथ्वीवरील थोडक्या दिवसांमध्ये काय चांगले करू शकतो हे मला हे बघायचे होते.

  15. तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.

  16. मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.

  17. तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो— कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे.

  18. चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. मैत्रिणी आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. नायिका त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!

  19. मनुक्यांनी मला बळ द्या, सफरचंदांनी मला ताजेतवाने करा, कारण प्रेमात मी दुर्बल झाले आहे.

  20. माझ्या भगिनी, माझ्या वधू, मी माझ्या बागेत आलो आहे; सुगंधी द्रव्यांबरोबर मी माझा गंधरसही गोळा केला आहे. मी मधाबरोबर आणि माझ्या मधाचे पोळे खात आहे. मी माझे द्राक्षारस आणि दूध प्यालो आहे. मित्र माझ्या मित्रांनो, खा आणि प्या; प्रीतीच्या आनंदाने भरून जा.

  21. मी तुझे मार्गदर्शन केले असते आणि तुला माझ्या आईच्या घरी घेऊन गेले असते— तिने मला शिकविलेला मसालेदार द्राक्षारस मी तुला, माझ्या डाळिंबाचा रस पिण्यास दिला असता.

  22. तुमची चांदी क्षुद्र झाली आहे, तुमचा उत्तम द्राक्षारस पाणी मिसळून पांचट झाला आहे.

  23. जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!

  24. त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.

  25. धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,