Skip to content

Wine बद्दल बायबलमधील वचने

175 वचने · 83 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.”

  2. मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?

  3. ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले आणि त्यांच्या द्राक्षारसाचे रसपान केले, ती दैवते आता कुठे आहेत? त्या दैवतांनी तुमच्या मदतीसाठी आता जागे व्हावे! त्यांनी त्यांचे आश्रयस्थान व्हावे!

  4. म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील.

  5. “परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’

  6. तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस.

  7. कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”

  8. तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.

  9. नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला.

  10. राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”

  11. जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे.

  12. रामाही शिमी राजाच्या द्राक्षमळ्यांवर देखरेख करणारा होता. जब्दी शिफमी द्राक्षारस बनविणे व त्याचा साठा करणे यास जबाबदार होता.

  13. आदेश बाहेर पडताक्षणीच इस्राएली लोकांनी उदारतेने त्यांच्या धान्याचे, नवीन द्राक्षारसाचे, जैतून तेलाचे आणि मधाचे आणि शेतात जे काही उत्पन्न आले त्याचे प्रथमफळ दिले. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दशांश मिळून एक मोठा भाग आणला.

  14. हंगामाचे धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांचा साठा ठेवण्यासाठी त्याने इमारती बांधल्या; आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारची गुरे आणि कळपांसाठी गोठे, मेंढवाडे बांधले.

  15. दररोज एक बैल, सहा पुष्ट मेंढरे, काही पक्षी यापासून बनविलेले अन्न माझ्यासाठी शिजविण्यात येत असे. तसेच दर दहा दिवसांनी मी त्यांना सर्वप्रकारचे द्राक्षारस विपुल प्रमाणात पुरवित असे. इतके असूनही राज्यपालांना जो भोजनभत्ता मिळण्याचा हक्क होता, तो मी कधीही मागितला नाही, कारण या सेवा लोकांना भारी पडत होत्या.

  16. इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”

  17. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला.

  18. निरनिराळे नक्षीकाम केलेल्या सुवर्णपात्रांतून पेय दिले जात होते आणि शाही मद्य राजाच्या औदार्यास साजेल असे विपुलतेने दिले जात होते.

  19. सातव्या दिवशी, अहश्वेरोश राजा मद्य पिऊन पूर्णपणे उल्लसित झाला असताना त्याने त्याच्या तैनातीस असलेल्या खोजांना—महूमान, बिजथा, हरबोना, बिग्था, अबग्था, जेथर व कर्खस यांना—

  20. मेजवानीत मद्य पुरविले जात असताना राजा परत एस्तेरला म्हणाला, “आता तुझी काय विनंती आहे? ते तुला देण्यात येईल. तुला काय पाहिजे? तुझी मागणी अर्ध्या राजाची असली, तर ती पूर्ण करण्यात येईल.”

  21. विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही कितीतरी अधिक आनंद तुम्ही माझ्या हृदयात दिला आहे.

  22. तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात; तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.

  23. कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.

  24. ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात, आणि मानवाने मशागत करावी— जमिनीतून अन्न उत्पादन करावे म्हणून:

  25. मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस, त्याचे मुख तुळतुळीत राखण्यासाठी तेल आणि त्याच्या हृदयाचे जतन व्हावे म्हणून भाकर उत्पन्न करतात.