Skip to content

Water बद्दल बायबलमधील वचने

197 वचने · 84 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा असताना पाणी भरण्यास आलेल्या एखाद्या मुलीला म्हणेन, ‘तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला प्यावयास दे,’

  2. तू अशांत पाण्यासारखा उग्र आहे, तू अजून उत्कृष्ट होणार नाही, कारण तू तुझ्या वडिलांच्या खाटेवर, माझ्या खाटेवर चढला आणि ते अशुद्ध केले.

  3. याहवेह असे म्हणतात: यावरून मी याहवेह आहे हे तुला कळेल: माझ्या हातात जी काठी आहे, ती मी नाईल नदीच्या पाण्यावर मारीन, आणि तिचे रक्त होईल.

  4. मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा रक्त असेल.”

  5. मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले.

  6. मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे.

  7. मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले.

  8. तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.

  9. मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.)

  10. सर्व इस्राएलाचा समाज सीन रानातून निघून, याहवेहच्या आज्ञेनुसार एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करीत गेले. मग त्यांनी रफीदीम येथे तळ दिला, पण तिथे लोकांना प्यावयास पाणी नव्हते.

  11. तेव्हा लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “आम्हाला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? तुम्ही याहवेहची परीक्षा का पाहता?”

  12. पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”

  13. होरेबातील खडकाकडे मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकाला काठीने मार आणि त्यातून लोकांना प्यावयास पाणी येईल.” मग मोशेने इस्राएलाच्या वडिलांदेखत तसे केले.

  14. मग अहरोन व त्याच्या पुत्रांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणून त्यांना पाण्याने धुवावे;

  15. “याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.

  16. ती एलअज़ार याजकाकडे द्यावी; तिला छावणीबाहेर न्यावे व त्याच्यासमोर कालवडीचा वध करावा.

  17. त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे.

  18. एलअज़ार याजकादेखत ती कालवड; तिचे कातडे, मांस, रक्त व आतडे यासह जाळण्यात यावी.

  19. याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा.

  20. त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.

  21. जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

  22. “शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.

  23. जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा.

  24. “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.

  25. त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.