Water बद्दल बायबलमधील वचने: (Deep,) of severe affliction
(Deep,) of severe affliction बद्दल वचने
तुम्ही लोकांना आमची डोकी तुडवून जाऊ दिले; आम्ही अग्नी आणि प्रलय यामधून गेलो, परंतु तुम्ही आम्हाला बाहेर काढून समृद्ध भूमीवर आणले आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरा, मला वाचवा; कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.
जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.
जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.