Water बद्दल बायबलमधील वचने: Purified by Elisha
Purified by Elisha बद्दल वचने
नगरातील लोक अलीशाला म्हणाले, “आमच्या प्रभू, जसे तुम्ही पाहत आहात, नगर उत्तम वसलेले आहे, परंतु पाणी वाईट आहे आणि भूमी नापीक आहे.”
तो म्हणाला, “मला एका नव्या वाटीत मीठ भरून आणून द्या.” त्याप्रमाणे त्यांनी ते त्याच्याकडे आणून दिले.
मग तो पाण्याच्या झर्याजवळ गेला आणि ते मीठ पाण्यात टाकून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मी या पाण्याला बरे केले आहे. येथून पुढे या पाण्यामुळे मृत्यू येणार नाही किंवा भूमी नापीक राहणार नाही.’ ”
आणि अलीशाने म्हटल्याप्रमाणे ते पाणी शुद्ध झाले आणि आजवरही तसेच आहे.