मुख्य मजकुरावर जा

Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने

107 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”

  2. त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.

  3. दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?

  4. जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास माझ्यावर हल्ला करतील, तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच अडखळतील आणि पडतील.

  5. जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला, तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही; माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले, तरी मी निश्चिंत राहीन.

  6. याहवेहची प्रतीक्षा कर; हिंमत बांध, धैर्य धर; आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.

  7. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा.

  8. तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा.

  9. माझ्यामागे येणार्‍या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.”

  10. अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत.

  11. माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत.

  12. पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.

  13. परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्‍यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला

  14. त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो, परंतु याहवेहने मला साहाय्य केले.

  15. सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा.

  16. लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल.

  17. सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत.

  18. याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील; त्यांची शरीरे उठतील— जे धुळीमध्ये पडून राहतात त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या— तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे; पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल.

  19. भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे; हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन; मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.

  20. “पाहा, जे तुमच्यावर चवताळले, ते निश्चितच लज्जित व अपमानित होतील; ज्यांनी तुम्हाला विरोध केला ते नाहीसे होऊन नाश पावतील.

  21. तुम्ही तुमच्या शत्रूचा शोध कराल, पण ते तुम्हाला सापडणार नाहीत. जे तुमच्याविरुद्ध युद्ध करतात त्यांचे अस्तित्वच राहणार नाही.

  22. कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे, जो तुमचा उजवा हात धरतो आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको; मी तुला साहाय्य करेन.

  23. हे कीटका याकोबा, भयभीत होऊ नको, हे लहानग्या इस्राएला, घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुम्हाला मदत करेन,” असे याहवेह, तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर घोषित करतात,

  24. “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात,

  25. “ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात; ते सत्याने या भूमीत विजय मिळवित नाहीत. ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,” असे याहवेह जाहीर करतात.