मुख्य मजकुरावर जा

Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने

107 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन.

  2. जो विजय मिळवितो तो त्यांच्यासारखा शुभ्र वस्त्रे परिधान करेल. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीच खोडणार नाही. तर माझ्या पित्यासमोर व त्यांच्या देवदूतांसमोर मी त्याच्या नावाचा जाहीरपणे स्वीकार करेन.

  3. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करेन. ते तिथून कधीही बाहेर जाणार नाहीत. माझ्या परमेश्वराचे नाव, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या परमेश्वराची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहेन.

  4. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो.

  5. पण आमच्या बंधुजनांनी कोकराच्या रक्ताने आणि आपल्या साक्षीच्या वचनाने त्याचा पाडाव केला. स्वतःच्या जिवावर प्रेम न करता त्यांनी मरण सोसले.

  6. तेव्हा संतापलेला अजगर त्या स्त्रीच्या इतर मुलांना, म्हणजे जी सर्व मुले परमेश्वराच्या आज्ञा पाळीत आणि आपण येशूंचे आहोत अशी साक्ष देत असत, त्यांच्यावर हल्ला करण्यास सिद्ध झाला.

  7. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील.