Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने: With prayer
With prayer बद्दल वचने
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा; जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा.
तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा.
माझ्यामागे येणार्या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.”
सर्वदा प्रार्थना करा. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक प्रसंगी, सर्वप्रकारच्या प्रार्थनेने आणि विनवणीने, प्रभूच्या लोकांसाठी जागृत राहून अगत्याने प्रार्थना करीत राहा.