मुख्य मजकुरावर जा

Warfare of Saints बद्दल बायबलमधील वचने: The flesh

7 वचने · 73 पैलू

"Warfare of Saints" साठी शोधा

The flesh बद्दल वचने

  1. पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.

  2. जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो.

  3. म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही.

  4. मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.

  5. मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला.

  6. दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.

  7. प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा.