Skip to content

Visions बद्दल बायबलमधील वचने

137 वचने · 32 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता,

  2. असे म्हणता, “अमावस्या केव्हा निघून जाईल म्हणजे आम्ही धान्य विकू शकू? आणि शब्बाथ केव्हा निघून जाईल, म्हणजे आम्ही धान्याचे कोठार उघडू?” तराजूत लबाडी करून, लबाडीच्या मापाने, किंमत वाढवू.

  3. म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, आणि गव्हाचा भुसाही विकायचा.

  4. मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले: “खांबांच्या वरच्या भागावर प्रहार करा म्हणजे उंबरठे हलतील. आणि ते सर्व लोकांच्या डोक्यावर खाली पाड; जे त्यातून वाचतील त्यांना मी तलवारीने मारून टाकीन. एक सुद्धा वाचणार नाही, कोणीही निसटणार नाही.

  5. तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.

  6. रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.

  7. नंतर प्रमुख याजक यहोशुआ हा याहवेहच्या दूतापुढे उभा असल्याचे दूताने मला दाखविले आणि सैतान ही तिथे दूताच्या उजव्या बाजूला होता आणि तो यहोशुआवर आरोप करीत होता.

  8. त्याने मला विचारले, “तुला आता काय दिसते?” मी उत्तर दिले, “सात दिवे असलेला एक ठोस सोन्याचा दीपवृक्ष मला दिसत आहे. त्याच्या वरच्या टोकाला एक कटोरा असून, त्यात सात दिवे होते व त्याला लावलेल्या नळ्यांमधून त्या दिव्यांना तेल पुरविले जाई.

  9. त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद असावी.”

  10. मग मी पुन्हा वर पाहिले, तो दोन पर्वतांमधून चार रथ येत असलेले मला दिसले. ते पर्वत कास्याचे होते.

  11. तेव्हा जखर्‍याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला.

  12. तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टान्त पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता.

  13. पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत.

  14. “चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला.

  15. मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभूची वाणी बोलताना ऐकली:

  16. ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’ हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

  17. तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला.

  18. तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.”

  19. आता दिमिष्क येथे हनन्याह नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टान्तामध्ये प्रभूने त्याला हाक मारली, “हनन्याह!” हनन्याह उत्तर देत म्हणाला, “आज्ञा प्रभूजी.”

  20. प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे.

  21. त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.”

  22. एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

  23. दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला.

  24. त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले.

  25. त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे.