Visions बद्दल बायबलमधील वचने: To Paul
To Paul बद्दल वचने
राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले.
याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला.
बाराशे रथ आणि साठ हजार घोडेस्वार आणि लिबिया, सुक्की आणि कूशी चे असंख्य सैन्य इजिप्तमधून त्याच्याबरोबर आले.
त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले.
तो प्रवास करीत दिमिष्क जवळ पोहोचत असताना अकस्मात आकाशातून त्याच्याभोवती प्रकाश चकाकताना त्याने पाहिला.
तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.”
रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.”
एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस.
आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’
जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला