मुख्य मजकुरावर जा

Visions बद्दल बायबलमधील वचने: To Ezekiel (See chapters 10,40-48 of Ezekiel)

36 वचने · 32 पैलू

To Ezekiel (See chapters 10,40-48 of Ezekiel) बद्दल वचने

  1. मी दृष्टी लावली आणि उत्तरेकडून तुफानी वारा, चकाकणार्‍या विजांसहित एक मोठा ढग प्रखर प्रकाशाने गुंडाळलेला असा मला दिसला. अग्नीचा मध्यभाग झळकत्या धातूसारखा होता,

  2. आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते,

  3. परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते.

  4. त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते.

  5. त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते.

  6. एकाचे पंख दुसर्‍याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे.

  7. त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते.

  8. अशाप्रकारे त्यांची मुखे होती. प्रत्येकाचे वरच्या बाजूने पसरलेले पंख होते जे त्यांच्या बाजूला असलेल्या प्राण्याच्या पंखाला स्पर्श करीत होते; आणि प्रत्येकाला आणखी दोन पंख होते ज्यांनी त्यांचे अंग झाकले जाई.

  9. आत्मा जाईल तिथे ते प्रत्येक सरळ पुढे जात असत आणि जात असताना ते अजिबात वळत नसत.

  10. त्या जिवंत प्राण्यांचे रूप जळत्या निखार्‍यासारखे किंवा मशालीसारखे होते. अग्नी त्या प्राण्यांमधून पुढे मागे जात असे; तो प्रखर होता आणि त्यातून विजा चमकत होत्या.

  11. ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असत.

  12. मी पाहिले, आणि मनुष्यासारखी दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्‍या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते.

  13. हातांसारख्या दिसणार्‍या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती.

  14. आणि जसे मैदानात मी पाहिले होते असेच तिथे इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव माझ्यासमोर होते.

  15. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली.

  16. आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”

  17. मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले.

  18. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला.

  19. आणि तो मला म्हणाला, “आत जा आणि ते इथे करीत असलेले दुष्ट व अमंगळ कृत्ये पाहा.”

  20. म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली.

  21. त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता.

  22. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”

  23. तो पुन्हा म्हणाला, “यापेक्षाही अधिक अमंगळ कृत्ये करताना तू त्यांना पाहशील.”

  24. मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराकडे आणले, तिथे मी स्त्रिया पाहिल्या ज्या बसून तम्मुत्स दैवतासाठी शोक करीत होत्या.

  25. आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेल्या दृष्टान्तामध्ये, आत्म्याने मला वर उचलले आणि बाबेलच्या निर्वासित लोकांकडे आणले. तेव्हा जो दृष्टान्त मी पाहत होतो तो समाप्त झाला,