Visions बद्दल बायबलमधील वचने: To Ananias
To Ananias बद्दल वचने
आता दिमिष्क येथे हनन्याह नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टान्तामध्ये प्रभूने त्याला हाक मारली, “हनन्याह!” हनन्याह उत्तर देत म्हणाला, “आज्ञा प्रभूजी.”
प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे.