Traitor बद्दल बायबलमधील वचने: Judas
Judas बद्दल वचने
यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला.
आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली.
त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”
येशू बोलत आहेत तोच, त्यांच्या बारा पैकी एक, यहूदाह तिथे पोहोचला. त्याच्याबरोबर महायाजक आणि वडीलजनांनी पाठविलेला मोठा जमाव तरवारी आणि सोटे घेऊन आला होता.
आता विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा.”
तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.
येशू त्याला म्हणाले, “मित्रा, ज्या कामासाठी तू आला आहेस ते आटोपून घे.” मग त्या पुरुषांनी पुढे येऊन येशूंना धरले आणि अटक केले.
नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला.
तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
ते बोलत आहेत तेव्हाच, त्यांच्या बारा शिष्यांपैकी एक यहूदा, महायाजकांनी आणि वडीलजनांनी पाठविलेल्या तरवारी आणि सोटे धारण करणार्या जमावाला बरोबर घेऊन पुढे आला.
आता त्या विश्वासघातक्याने जमावाला खूण देऊन ठेवली होती, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.”
तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “गुरुजी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले.
तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला.
तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली.
त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले.
या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला.
पण पाहा, जो माझा विश्वासघात करणार आहे त्याचा हात माझ्याबरोबर या मेजावर आहे.
परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे मानवपुत्र जातो खरा, पण जो मनुष्य त्यांना विश्वासघाताने धरून देत आहे त्याचा धिक्कार असो.”
हे ऐकून असे कृत्य करणारा आपल्यापैकी कोण असेल, असा प्रश्न ते आपसात विचारू लागले.
ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला,
तेव्हा येशूने त्याला विचारले, “यहूदा, चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?”
संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.
यहूदाहने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला. येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.”
येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.