Skip to content

Threshing बद्दल बायबलमधील वचने

58 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा ते यार्देन नदीच्या पश्चिम तीरावर यरीहोजवळ अटाद या ठिकाणी आले; तेव्हा त्यांनी तिथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाच्या वडिलांसाठी त्यांनी सात दिवस तिथे शोक केला.

  2. जेव्हा तिथे राहणाऱ्या कनानी लोकांनी अटादच्या खळ्यावर शोक करताना पाहिले, यार्देनजवळच्या त्या जागेला आबेल-मिस्राईम असे नाव ठेवले. कारण ते म्हणाले, “इजिप्तच्या लोकांची ही मोठा शोक करण्याची जागा आहे.”

  3. द्राक्षमळ्याची कापणी होईपर्यंत तुझी मळणी सुरूच राहील आणि द्राक्षांची कापणी पेरणी होईपर्यंत चालू राहील आणि पोटभर अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि देशात सुरक्षित राहाल.

  4. तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल.

  5. बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.

  6. याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.

  7. पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.”

  8. अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा भरले.

  9. ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल.

  10. आंघोळ कर, सुगंधी अत्तर लाव आणि तुझी उत्तम वस्त्रे घाल. नंतर खाली खळ्यात जा, परंतु त्याचे खाणे आणि पिणे होईपर्यंत त्याला माहीत होऊ देऊ नकोस की, तू तिथे आहेस.

  11. जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा तो कुठे झोपत आहे, हे पाहून ठेव. नंतर जा आणि त्याच्या पायांवरील पांघरूण काढ आणि तिथेच पडून राहा. काय करावयाचे तोच तुला सांगेल.”

  12. रूथने उत्तर दिले, “तुम्ही जे काही सांगता ते मी करेन.”

  13. तेव्हा ती खाली खळ्यात गेली आणि तिच्या सासूने जे सर्वकाही तिला करावयास सांगितले होते तसे तिने केले.

  14. जेव्हा बवाजने खाणे आणि पिणे संपविले आणि तो आनंदात होता, मग तो झोपण्यासाठी धान्य रचून ठेवलेल्या ढिगाऱ्यांच्या शेवटी गेला. रूथ शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या पायांवरचे पांघरूण काढले आणि तिथेच पडून राहिली.

  15. मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती!

  16. त्याने विचारले, “तू कोण आहेस?” “मी तुमची दासी रूथ आहे. तुमच्या वस्त्राचा कोपरा माझ्यावर पसरून टाका, कारण तुम्ही आमच्या कुटुंबाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहात.”

  17. “माझ्या मुली, याहवेह तुला आशीर्वाद देवो,” त्याने उत्तर दिले. “जो दयाळूपणा तू आता दाखविला, तो पूर्वी दाखविला त्यापेक्षा अधिक आहे: गरीब असो वा श्रीमंत, पण तू अशा तरुण पुरुषांच्या मागे गेली नाहीस.

  18. आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस.

  19. ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे.

  20. आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”

  21. म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “हे कोणालाही कळू देऊ नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.”

  22. जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.”

  23. जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.

  24. जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.

  25. दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्‍या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”