Skip to content

Ruth

13 वचने · 3 कुटुंब सदस्य

Ruth चा उल्लेख असलेली वचने

  1. त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर,

  2. त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली.

  3. परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील.

  4. अशाप्रकारे नाओमी, तिची मोआबी सून रूथबरोबर मोआब देशातून परत आली, त्या दोघी बेथलेहेमात पोहोचल्या, त्यावेळी सातूचा हंगाम सुरू झाला होता.

  5. आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.”

  6. तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्‍या स्त्रियांबरोबर इथेच राहा.

  7. तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ”

  8. नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्‍या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.”

  9. त्याने विचारले, “तू कोण आहेस?” “मी तुमची दासी रूथ आहे. तुमच्या वस्त्राचा कोपरा माझ्यावर पसरून टाका, कारण तुम्ही आमच्या कुटुंबाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहात.”

  10. तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”

  11. मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”

  12. तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला.

  13. सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता,