Skip to content

Mother-in-Law बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “ ‘तू एखाद्या स्त्रीसोबत आणि तिच्या कन्येसोबत शारीरिक संबंध ठेऊ नकोस. तिच्या पुत्राच्या किंवा कन्येच्या कन्येशी तू शारीरिक संबंध ठेऊ नकोस, कारण ते तिचे जवळचे नातेवाईक आहेत; आणि असे करणे भयंकर पाप आहे.

  2. “ ‘एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करून तिच्या आईबरोबरही विवाह केला, तर ती भयंकर दुष्टता आहे. तुमच्यातील ही दुष्टता निपटून काढण्यासाठी त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे.

  3. “जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  4. त्या पुन्हा आणखीच मोठ्याने रडू लागल्या. नंतर ओफराहने तिच्या सासूचे चुंबन घेऊन तिचा निरोप घेतला, परंतु रूथ तिला बिलगून राहिली.

  5. तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.”

  6. परंतु रूथने उत्तर दिले, “तुम्हाला सोडून जाण्याचा किंवा तुमच्यापासून परत जाण्याचा आग्रह मला करू नका. कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जिथे राहाल, तिथे मी राहीन. तुमचे लोक हे माझे लोक होतील आणि तुमचे परमेश्वर हे माझे परमेश्वर होतील.

  7. तुम्ही मराल तिथे मी मरेन आणि तिथेच मला मूठमाती देण्यात यावी. मरणाशिवाय तुम्हाला आणि मला वेगळे केले तर याहवेह माझा अधिक कठोरपणे न्याय करो.”

  8. “ ‘मनुष्य आपल्या पित्याविरुद्ध, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे.

  9. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले.

  10. येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.