Skip to content

Threshing बद्दल बायबलमधील वचने

58 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात: “दिमिष्कच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने गिलआदला मळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे,

  2. पण त्यांना याहवेहचे विचार माहीत नाहीत; त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही, खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे.

  3. “अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; कारण मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर देईन, आणि तू अनेक राष्ट्रांचे तुकडे करशील.” त्यांची लूट तू याहवेहला, त्यांची संपत्ती सर्व पृथ्वीच्या प्रभूला अर्पण करशील.

  4. क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले.

  5. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”

  6. कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?

  7. हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.

  8. कारण पवित्रशास्त्र म्हणते, “बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको” आणि “कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!”