मुख्य मजकुरावर जा

The Wisdom of God बद्दल बायबलमधील वचने

61 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.

  2. याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्याला आशीर्वादित केले आहे. या विशाल अरण्यात तुमचे भटकणे त्यांनी पाहिले आहे, चाळीस वर्षे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत व तुम्हाला कशाचेही उणे पडले नाही.

  3. “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

  4. “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.

  5. “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.

  6. आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.

  7. फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे.

  8. त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?

  9. खरोखर ते फसविणार्‍यास ओळखतात; आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का?

  10. “परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल, कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?

  11. परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत; जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्‍यासारखा मी प्रमाणित होईन.

  12. कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात. आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते.

  13. “मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.

  14. ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत; ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे.

  15. “परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही; ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत.

  16. मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे?

  17. कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो.

  18. तर परमेश्वराला ते समजले नसते काय? कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.

  19. ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”

  20. कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे.

  21. हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.

  22. ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.

  23. माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.

  24. माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.

  25. हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.