Skip to content

The Second Temple बद्दल बायबलमधील वचने

134 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.

  2. त्यांनी अधिकार्‍यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.

  3. नंतर जेव्हा अहश्वेरोश राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली.

  4. राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीतही त्यांनी असेच केले. बिश्लाम, मिथ्रदाथ, ताबील आणि त्यांचे साथीदार यांनी पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत व अरामी लिपीत पत्र पाठविले.

  5. राज्यपाल रहूम, शिमशय लेखक यांनी यरुशलेमविरुद्ध पर्शियाचा राजा अर्तहशश्तला अरामी भाषेत असे पत्र लिहिले:

  6. राज्यपाल रहूम, शिमशय लेखक, तसेच अनेक न्यायाधीश, स्थानिक पुढारी आणि पर्शियाचे, बाबेलच्या येरेक आणि सुसा येथील एलामी लोक त्यात सामील होते.

  7. तसेच इतर अनेक राष्ट्रांचे लोकही या पत्राच्या लेखनात गोवलेले होते. त्यांना महान आणि थोर आसनपर ने त्यांच्या स्वतःच्या देशातून काढून पुन्हा यरुशलेमात, शोमरोनात व फरात नदीच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशांमध्ये वसविले होते.

  8. अर्तहशश्त राजास त्यांनी पाठविलेल्या पत्रात असा मजकूर होता: अर्तहशश्त महाराज, फरात नदीच्या पश्चिमेला राहणार्‍या आपल्या विश्वासू प्रजाजनांकडून आपणास शुभेच्छा.

  9. कृपया राजास ही बाब विदित असावी की, बाबेलमधून यरुशलेमला पाठविलेले यहूदी लोक हे बंडखोर आणि दुष्ट शहर पुन्हा बांधत आहेत. ते या शहराचे कोट पुन्हा बांधत आहेत व मंदिराच्या पायाची दुरुस्तीही सुरू झाली आहे.

  10. परंतु हे शहर पुन्हा बांधले गेले, शहराचे कोट पुन्हा बांधले, तर त्यात महाराजांचे नुकसान आहे, कारण मग यहूदी लोक आपली खंडणी, नजराणे व कर भरण्यास नकार देतील.

  11. आमचे आश्रयदाते म्हणून आम्ही आपले ॠणी आहोत आणि महाराजांच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेऊन, आपली अप्रतिष्ठा व्हावी, हे आम्हाला बघण्याची इच्छा नाही. म्हणून आम्ही ही बातमी महाराजांस पत्र पाठवून कळवीत आहोत.

  12. आम्ही आपणास अशी विनंती करतो की आपण या शहराचा राजद्रोहाचा जुना इतिहास आपल्या पूर्वजांच्या जुन्या कागदपत्रात शोधून पाहावा, म्हणजे हे नगर मागील काळात किती बंडखोर होते हे आपणास आढळून येईल. राजांच्या विरुद्ध आणि त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रांविरुद्ध बंडाळी केल्यामुळेच या नगराचा नाश करण्यात आला होता.

  13. आता आम्ही असे जाहीर करू इच्छितो की जर हे नगर परत बांधले गेले आणि त्याची तटबंदी पूर्ण झाली, तर फरात नदीच्या पलीकडील काहीही प्रदेश महाराजांच्या ताब्यात राहणार नाही.

  14. अशा रीतीने यरुशलेममधील परमेश्वराच्या मंदिराचे बांधकाम पर्शियाचा राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षापर्यंत स्थगित झाले.

  15. मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.

  16. परंतु फरातच्या पश्चिमेकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ आणि शथर-बोजनइ व त्यांचे सोबती यरुशलेमात आले व त्यांनी विचारले, “हे मंदिर पुनर्बांधणीची व पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”

  17. त्यांनी हे देखील विचारले, “मंदिर बांधण्याचे काम करणार्‍या सर्व लोकांची नावे काय आहेत?”

  18. पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही.

  19. फरात नदीपलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सहकारी यांनी दारयावेश राजाला जे पत्र पाठविले त्याचा मजकूर असा होता:

  20. त्यांनी जे पत्र पाठविले ते असे: दारयावेश महाराज, आपणास आमच्या शुभेच्छा!

  21. आमची राजाला हे कळविण्याची इच्छा आहे की, आम्ही यहूदीयाच्या महान परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या जागी गेलो. ते मंदिर मोठमोठ्या पाषाणांनी बांधले जात आहे आणि भिंतीत लाकडे घातली जात आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बांधकामाची अतिशय उत्साहाने आणि यशस्वी रीतीने प्रगती होत आहे.

  22. आम्ही पुढार्‍यांना विचारले, “या मंदिराची पुनर्बांधणीची करून ते पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”

  23. आम्ही त्यांची नांवे विचारली, कारण आम्ही त्यांच्या पुढाऱ्यांची नावे लिहून तुमच्या माहिती करिता तुम्हास कळवावी.

  24. त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले: “आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत.

  25. कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.