Skip to content

Josedech

12 वचने · 3 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jehozadak, Jozadak

Josedech चा उल्लेख असलेली वचने

  1. अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.

  2. याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.

  3. नंतर योसादाकाचा पुत्र येशूआने आपल्या बरोबरीच्या याजकांना आणि शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व त्याच्या बंधूना बरोबर घेऊन इस्राएलांच्या परमेश्वराची वेदी पुन्हा बांधली आणि परमेश्वराचा मनुष्य मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदीवर होमार्पणे वाहिली.

  4. इस्राएली लोक यरुशलेमला परमेश्वराच्या भवनात आल्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, योसादाकाचा पुत्र येशूआ व त्यांच्याबरोबर त्यांचे याजकबंधू व लेवीबंधू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बंदिवासाहून परत आलेले सर्वजण कामास लागले. वीस वर्षे वा अधिक वयाच्या लेव्यांना याहवेहच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.

  5. मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.

  6. योसादाकाचा पुत्र येशूआचा पुत्र योयाकीमच्या कार्यकालात म्हणजे जेव्हा नहेम्याह राज्यपाल होता व एज्रा याजक व नियमाचा शिक्षक होता, तेव्हा हे कामावर होते.

  7. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला:

  8. तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले.

  9. याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली.

  10. शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, यहूदीयाचा राज्यपाल व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक आणि देशातील अवशिष्ट लोकांशी बोल. त्यांना विचार,

  11. परंतु हे जरूब्बाबेला, बलवंत हो. हे प्रमुख याजका यहोशुआ, यहोसादाकाच्या पुत्रा बलवंत हो. या देशातील सर्व लोकहो, बलवंत व्हा आणि कामाला लागा, याहवेह जाहीर करतात. कारण ‘मी तुम्हाबरोबर आहे,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  12. रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव.