मुख्य मजकुरावर जा

The Second Temple बद्दल बायबलमधील वचने: Solemnities connected with laying the foundation of

3 वचने · 49 पैलू

Solemnities connected with laying the foundation of बद्दल वचने

  1. परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाची सर्व देखरेख येशूआ व त्याचे बंधू व पुत्र, तसेच (यहूदाहचे वंशज) कदमीएल व त्याचे पुत्र, हेनादादचे पुत्र व नातेवाईक यांच्यावर सोपविली होती. हे सर्वजण लेवी होते.

  2. बांधकाम करणार्‍यांनी याहवेहच्या मंदिराच्या पायाचे बांधकाम पूर्ण केले, तेव्हा याजकांनी आपले याजकीय पोशाख घातले व आपल्या तुतार्‍या वाजविल्या. आसाफाच्या वंशातील लेव्यांनी आपल्या झांजा वाजविल्या. इस्राएलच्या दावीद राजाने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी याहवेहची स्तुती केली.

  3. त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: “याहवेह चांगले आहेत. इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.