Skip to content

The Second Temple बद्दल बायबलमधील वचने

134 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ”

  2. मग हाग्गय संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

  3. “भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?”

  4. सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या.

  5. तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”

  6. पर्वतावर जा आणि लाकडे घेऊन या आणि माझे भवन बांधा. म्हणजे मी त्यात संतोष पावेन आणि गौरवित होईन,” असे याहवेह म्हणतात.

  7. “तुम्ही पुष्कळाची आशा केली, परंतु पाहा, तुम्हाला किती थोडेसे मिळाले. तुम्ही जे घरी आणले, मी ते फुंकर घालून उडविले का? सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, कारण माझे भवन ओसाड पडलेले आहे आणि तुम्ही स्वतःच्या घरात व्यस्त आहात.

  8. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे.

  9. मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”

  10. “या भवनाची पूर्वीची भव्यता कशी होती हे सांगण्यास तुमच्यातील कोणी उरले आहे काय? हे सध्याचे काहीच नाही असे तुम्हाला वाटते ना?

  11. मी सर्व राष्ट्रे हलवेन आणि सर्व राष्ट्रांची जी इच्छा आहे ते येईल आणि मी गौरवाने हे स्थान भरेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  12. ‘रुपे माझे आहे व सोनेही माझे आहे,’ सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  13. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, ‘सध्याच्या या भवनाचे वैभव पहिल्या भवनाच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल, या स्थळात मी शांती बहाल करेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.”

  14. “ ‘आता तुम्ही आजपासून गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती.

  15. तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात.

  16. धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”

  17. तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला मी विचारले, “माझ्या प्रभू, हे काय आहे?”

  18. त्यावर देवदूताने उत्तर दिले, “हे काय आहे तुला माहीत नाही काय?” तेव्हा मी म्हणालो, “नाही, प्रभू.”

  19. मग तो मला म्हणाला, “जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  20. “हे विशाल पर्वता, तू कोण आहेस? जरूब्बाबेलापुढे तू सपाट मैदान असा होशील. मग तो शिखरशिलेस बाहेर आणून प्रचंड गजर करेल, ‘याहवेह आशीर्वादित करो! याहवेह आशीर्वादित करो!’ ”

  21. याहवेहकडून मला एक वचन मिळाले:

  22. “जरूब्बाबेलाच्या हस्ते या मंदिराचा पाया घातला; आणि तोच स्वहस्ते ते पूर्ण करेल. तेव्हा तुम्हाला समजेल की सर्वसमर्थ याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.

  23. “ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?”

  24. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “आता हे शब्द ऐका, ‘तुमचे बाहू बलवंत करा, जेणेकरून मंदिर बांधून पूर्ण होईल.’ जेव्हा सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराचा पाया घातला, तेव्हा जे संदेष्टे तिथे हजर होते, त्यांनी तुम्हाला हे सांगितले होते.

  25. त्या वेळेपर्यंत लोकांना कामासाठी मजुरी नव्हती किंवा जनावरे भाड्याने मिळत नव्हती. शत्रूच्या भयापायी कामधंदे करण्यास इतरत्र जाणे सुरक्षित नव्हते, कारण मी तुम्हा प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याविरुद्ध केले होते.