Skip to content

The Second Temple बद्दल बायबलमधील वचने

134 वचने · 49 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  2. मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले.

  3. येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली.

  4. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”

  5. येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.”

  6. “संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—

  7. “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”

  8. त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले

  9. येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, “पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!”

  10. येशू उत्तरले, “तुम्ही आता या भव्य इमारती पाहता ना? याच्या एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड पाडला जाईल.”

  11. मी दररोज तुमच्याबरोबर होतो, मंदिराच्या परिसरात शिकवीत असे, पण तुम्ही मला धरले नाही. परंतु धर्मशास्त्र पूर्ण झाले पाहिजे.”

  12. आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.

  13. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले.

  14. पवित्र आत्म्याने प्रवृत्त होऊन तो मंदिराच्या परिसरात गेला. तेव्हा आईवडिलांनी नियमशास्त्रात सांगितलेला विधी पूर्ण करण्यासाठी येशू बाळाला मंदिरात आणले,

  15. मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,”

  16. “दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार.

  17. त्यांचे काही शिष्य मंदिराबद्दल प्रशंसा करीत होते की, ते कसे सुंदर पाषाणांनी आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या देणग्यांनी सजविले आहे. परंतु येशू म्हणाले,

  18. “जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक स्थापित असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”

  19. तिथे त्यांनी मंदिराच्या अंगणात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैसे बदलून देणारे लोक यांना पाहिले,

  20. तेव्हा त्यांनी दोर्‍यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्‍यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली.

  21. मग जे कबुतरे विक्रेते होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!”

  22. तेव्हा शिष्यांना हा शास्त्रलेख आठवला: “तुझ्या मंदिराविषयीच्या ईर्षेने मला ग्रासून टाकले आहे.”

  23. त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?”

  24. ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता.

  25. आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलोमोनच्या अंगणामध्ये फिरत होते.