मुख्य मजकुरावर जा

The Reward of Saints बद्दल बायबलमधील वचने

85 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”

  2. जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील.

  3. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का?

  4. आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे.

  5. आपण त्याला सर्व लोकांवर अधिकार दिला आहे, ते यास्तव की ज्यांना तुम्ही त्याच्याकडे सोपविले आहे, त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे.

  6. आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.

  7. “हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.

  8. “आणि आता मी तुम्हाला परमेश्वरावर व त्यांच्या कृपेच्या वचनांवर सोपवितो, ते वचन तुमची वृद्धी करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्वांमध्ये वतन द्यावयास समर्थ आहे.

  9. यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’

  10. जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.

  11. आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे.

  12. जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्‍या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो.

  13. यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.

  14. ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो.

  15. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.

  16. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.

  17. तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत.

  18. आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही.

  19. तरी शास्त्रलेखानुसार: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कोणत्याही कानावर पडले नाही, माणसाच्या मनात आले नाही,”— त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—

  20. आपण प्रभूचे लोक जगाचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहीत नाही काय? असे असताना, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींचा आपसात न्याय करण्यास समर्थ नाही का?

  21. जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो.

  22. यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत.

  23. आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही.

  24. म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे.

  25. आम्हास ठाऊक आहे की ज्या ऐहिक तंबू—आमचे शरीर—मध्ये आम्ही राहतो त्याचा जर नाश झाला, तर परमेश्वराने आमच्यासाठी इमारत, सार्वकालिक स्वर्गीय घर जे मानवी हाताने बांधलेले नाही असे तयार केले आहे.