मुख्य मजकुरावर जा

The Reward of Saints बद्दल बायबलमधील वचने

85 वचने · 51 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा.

  2. तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.

  3. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो.

  4. तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”

  5. मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.” आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”

  6. नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले.

  7. जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील.

  8. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल.

  9. तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील.

  10. “पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन.