मुख्य मजकुरावर जा

The Levites बद्दल बायबलमधील वचने

255 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.

  2. तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे.

  3. कार्यासाठी नियुक्त केलेले याजक व लेवी हे शुद्ध केलेले आहेत म्हणून यांच्याशिवाय याहवेहच्या मंदिरात कोणी प्रवेश करू नये; परंतु प्रवेश करू नये ही याहवेहची आज्ञा इतर सर्वांनी पाळावी.

  4. प्रत्येक लेवींनी हातात शस्त्र घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”

  5. हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिरात भांडारगृहे तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते काम पूर्ण झाले.

  6. नंतर त्यांनी विश्वासूपणाने वर्गणी, दशांश आणि समर्पित भेटवस्तू आणल्या. कनन्याह नावाचा लेवी या सर्व गोष्टींचा प्रभारी पर्यवेक्षक होता आणि त्याचा भाऊ शिमी त्याच्या नंतरच्या श्रेणीतील अधिकारी होता.

  7. यहीएल, अजज्याह, नहाथ, असाहेल, यरिमोथ, योजाबाद, एलीएल, इस्माकियाह, महथ आणि बेनाइयाह हे कनन्याह आणि त्याचा भाऊ शिमीचे सहायक होते. या सर्वांना राजा हिज्कीयाहने नियुक्त केल्यामुळे त्यांनी सेवा केली आणि अजर्‍याह परमेश्वराच्या मंदिराचा नियुक्त प्रभारी अधिकारी म्हणून सेवा करीत होता.

  8. इम्नाह लेवीचा पुत्र कोरे, पूर्वेकडील वेशीचा रखवालदार, परमेश्वराला स्वैच्छिक अर्पणावरील याहवेहना मिळालेल्या वर्गणीचे वाटप करणे आणि पवित्र भेटवस्तू यावरील अधिकारी होता.

  9. एदेन, मिन्यामीन, येशूआ, शमायाह, अमर्‍याह आणि शखन्याहनी त्याला विश्वासयोग्यतेने याजकांच्या गावांमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या वृद्ध आणि तरुण याजकांना त्यांच्या विभागानुसार वाटप करण्यासाठी मदत केली.

  10. त्या शिवाय त्यांनी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ज्यांची नावे वंशावळीच्या नोंदींमध्ये होती त्यांना वाटप केले, जे सर्व लोक त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या विभागानुसार त्यांची रोजची वेगवेगळी नेमून दिलेली सेवा पार पाडण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश करतील.

  11. आणि त्यांनी त्यांच्या घराण्यांनी नोंदविलेल्या वंशावळीतील याजकांना आणि त्याचप्रमाणे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लेवींना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि विभागणी यानुसार वाटून दिल्या.

  12. त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते.

  13. याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले.

  14. यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा.

  15. संगीतकारांनाही यरुशलेम सभोवतालच्या प्रदेशातून व नटोफाथी प्रांतातून आणले.

  16. बेथ-गिलगाल, गेबाच्या प्रांतातून व अजमावेथ येथूनही हे संगीतकार आले, कारण त्यांनी यरुशलेमच्या सभोवती आपली उपनगरे बांधली होती.

  17. प्रथम याजक व लेवींनी स्वतःला शुद्ध करून घेतले. नंतर त्यांनी लोकांना, तटाला आणि वेशींना शुद्ध केले.

  18. मी यहूदाह पुढार्‍यांना तटावर नेले. धन्यवाद देण्याकरिता त्यांचे दोन मोठे गायकवृंद तयार केले. स्तुतिस्तोत्रे गात त्या रांगा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालल्या. एक गायकवृंद तटाच्या वर उजवीकडे म्हणजे उकिरडा वेशीकडे चालली.

  19. होशयाह व यहूदाहच्या पुढार्‍यांपैकी अर्धे त्यांच्या मागोमाग चालले.

  20. अजर्‍याह सोबत, एज्रा, मशुल्लाम,

  21. यहूदाह, बिन्यामीन, शमायाह व यिर्मयाह यांचा त्यात समावेश होता.

  22. तसेच काही याजकांनी कर्णे वाजविले आणि जखर्‍याह, योनाथानाचा पुत्र, तो शमायाहचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, तो मिखायाहचा पुत्र, तो जक्कूराचा पुत्र, तो आसाफाचा पुत्र होता,

  23. त्याचे सहकारी—शमायाह, अजरएल, मिललई, गिललई, माई, नथानेल, यहूदाह व हनानी—यांनी परमेश्वराचा मनुष्य दावीदाने नेमून दिलेली वाद्ये वापरली. एज्रा शास्त्राचा शिक्षक त्यांच्या अग्रभागी चालला होता.

  24. ते झरावेशीजवळ आले, तेव्हा ते सरळ पुढे गेले व दावीदाच्या नगराच्या पायर्‍यांवरून तटाच्या चढणीवर असलेल्या दावीदाच्या महालाच्या वरच्या भागाकडून पूर्वेकडे पाणीवेशीपर्यंत गेले.

  25. स्तुतिगान करणारे दुसरे गायकवृंद विरुद्ध दिशेने पुढे निघाले. मी वरच्या बाजूने त्यांच्यात सामील होण्यास दुसऱ्या अर्ध्या लोकांबरोबर निघालो—आम्ही भट्टीबुरुजापासून रुंद तटापर्यंत चालत गेलो.