मुख्य मजकुरावर जा

The Levites बद्दल बायबलमधील वचने

255 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.

  2. नंतर धन्यवाद देणारे दोन्ही गायकवृंद परमेश्वराच्या भवनात जाऊन त्यांनी आणि अर्ध्या अधिकाऱ्यांसह मी देखील आपले नेमलेले स्थान ग्रहण केले.

  3. तसेच कर्णे वाजविणारे याजक—एल्याकीम, मासेयाह, मिन्यामीन, मिखायाह, एलिओएनाइ, जखर्‍याह, आणि हनन्याह.

  4. व मासेयाह, शमायाह, एलअज़ार, उज्जी, यहोहानान, मल्कीयाह, एलाम व एजेर यांनीही यझ्रहयाहच्या मार्गदर्शनाखाली गायकवृंदाने गाईले.

  5. या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.