मुख्य मजकुरावर जा

The Edomites बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 62 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही, तिचे सर्व राजपुत्र नाहीसे होतील.

  2. काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील, जंगली झाडे आणि रानटी काटेरी झुडूपे तिचे गड ग्रासून टाकतील. कोल्ह्यांना संचार करण्याची ती जागा होईल, घुबडांचे घर होईल.

  3. वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील, आणि रानबोकडे एकमेकांना साद घालतील; तिथे निशाचरही झोपतील आणि त्यांना विश्रांतीच्या जागा मिळतील.

  4. तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल, ती तिच्या पंखाच्या सावलीत त्यांना उबवेल आणि पिलांची काळजी घेईल; तिथे प्रत्येक बाज पक्षीही आपल्या जोडीदारासह जमतील.

  5. याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा: यामधील कोणाचाही अभाव होणार नाही, एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही. कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे, आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल.

  6. ते त्यांच्या भागांचे वाटप करतात; त्यांच्या हाताने त्यांना मोजून वाटतात. तो भाग सर्वकाळासाठी त्यांच्याकडे राहील आणि ते पिढ्यान् पिढ्या तिथे निवास करतील.

  7. एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

  8. तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्‍यांसारखी लाल रंगाची का आहेत?

  9. “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. माझ्या क्रोधाने मी ती तुडविली आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली.

  10. माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.

  11. याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.

  12. जेव्हा ते यातून पितील तेव्हा ते झोकांड्या खातील व वेडे होतील, कारण मी त्यांच्यावर तलवारीचा प्रहार करेन.”

  13. तेव्हा मी याहवेहच्या हातातून तो प्याला घेतला आणि त्यांनी मला ज्या राष्ट्रांकडे पाठविले, त्या प्रत्येक राष्ट्राला त्यातून प्यावयला लावले:

  14. यरुशलेम व यहूदीयाची नगरे, आणि त्यांचे राजे आणि अधिपती या सर्वांनी पडीक व भयानकतेचे एक उदाहरण, तिरस्कृत व शापित व्हावे—जसे ते आजही आहेत;

  15. इजिप्तचा राजा फारोह व त्याचे सेवक, अधिपती व सर्व लोक, त्या देशात असलेले सर्व परकीय लोक;

  16. त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);

  17. एदोम, मोआब व अम्मोन;

  18. तसेच सोर व सीदोन येथील सर्व राजे; समुद्रापलीकडच्या तटवर्तीप्रदेशातील सर्व राजे;

  19. ददान, तेमा व बूज, तसेच जे दूरच्या देशात असलेले;

  20. आणि अरबस्थानातील सर्व राजे व वाळवंटात राहणारे विदेशी लोकांचे राजे;

  21. जिम्री, एलाम व मेदिया येथील सर्व राजे;

  22. तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.

  23. “त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: माझ्या क्रोधाने भरलेल्या या प्याल्यातून तुम्ही प्या, धुंद होईपर्यंत प्या, आणि मग ओकारी करा, व पुन्हा कधीही न उठण्याकरिता पडा, कारण मी तुमच्यावर तलवार पाठवित आहे.’

  24. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  25. त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की: