मुख्य मजकुरावर जा

The Edomites बद्दल बायबलमधील वचने

89 वचने · 62 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो.

  2. यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे.

  3. मी सेईर पर्वताला ओसाड करेन आणि जे त्यावरून येणे जाणे करतात त्यांचा मी नाश करेन.

  4. वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्‍यात आणि तुझ्या ओहोळात पडतील.

  5. मी तुला कायमचे ओसाड करेन; तुझ्या नगरांत पुन्हा कोणीही वसणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  6. “ ‘कारण मी याहवेह तिथे होतो तरीही तुम्ही म्हटले, “हे दोन देश व राष्ट्रे आमची होतील आणि आम्ही त्याचे वतन पावू,”

  7. म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, त्यांच्याप्रीत्यर्थ तुम्ही जो राग व हेवा प्रकट केला त्यानुसार मी तुमच्याशी वागेन आणि जेव्हा मी तुमचा न्याय करेन, तेव्हा मी स्वतःला त्यांच्यामध्ये प्रकट करेन.

  8. तेव्हा तुम्ही जाणाल मी याहवेहने त्या तिरस्करणीय गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुम्ही इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध उच्चारल्या. तुम्ही म्हटले, “ते उजाड पडले आहेत आणि आम्ही गिळून टाकावे म्हणून त्यांना आमच्या हाती दिले आहे.”

  9. तुम्ही माझ्याविरुद्ध फुशारकी मारली आणि संयम न ठेवता माझ्याविरुद्ध बोलला आणि ते मी ऐकले.

  10. सार्वभौम याहवेह असे म्हणतात: सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुम्हाला उजाड करेन.

  11. कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  12. पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.

  13. याकोब अग्नीसारखा आणि योसेफ ज्वालासारखे असतील; एसाव उरलेल्या भुशासारखे होतील, आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील. एसावच्या वंशजांपैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” याहवेहने हे म्हटले आहे.

  14. एसावाचा पर्वत दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, आणि पलिष्टी लोकांच्या देशाला डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.