मुख्य मजकुरावर जा

The Edomites बद्दल बायबलमधील वचने: Punishment for persecuting Israel

8 वचने · 62 पैलू

"The Edomites" साठी शोधा

Punishment for persecuting Israel बद्दल वचने

  1. माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.

  2. याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, ती चरबीने झाकलेली आहे— कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.

  3. आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि गोर्‍हे व मोठे बैल यज्ञात पडतील. त्यांची भूमी रक्ताने चिंब भिजून जाईल, आणि धूळ चरबीमध्ये पूर्ण भिजली जाईल.

  4. कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.

  5. एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

  6. तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्‍यांसारखी लाल रंगाची का आहेत?

  7. “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. माझ्या क्रोधाने मी ती तुडविली आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली.

  8. माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.