मुख्य मजकुरावर जा

The Canaanites बद्दल बायबलमधील वचने

62 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यानंतर अदोनी-बेजेक म्हणाला, “ज्या सत्तर राजांच्या हातापायांचे आंगठे कापून टाकले आणि ते माझ्या मेजाखालचे तुकडे उचलतात. आता परमेश्वराने मला त्याची परतफेड दिली आहे.” त्यांनी त्याला यरुशलेमला आणले आणि तिथे तो मरण पावला.

  2. यहूदाह गोत्राच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि ते देखील जिंकून घेतले. तेथील लोकांची तलवारीने कत्तल केली आणि त्या शहराला आग लावून दिली.

  3. त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले.

  4. मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्‍या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला.

  5. तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला.

  6. कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.”

  7. कालेबाचा लहान भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले; म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह पत्नी म्हणून त्याला दिली.

  8. एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”

  9. तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले.

  10. मोशेच्या सासर्‍याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.

  11. नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह असे म्हणतात.

  12. यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.

  13. याहवेह यहूदाहच्या लोकांसह होते. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील देशांचा पूर्णपणे ताबा घेतला, परंतु खोर्‍यात राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना ते हाकलू शकले नाहीत.

  14. मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले.

  15. तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्‍या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.

  16. योसेफाच्या गोत्रांच्या लोकांनी बेथेलवर स्वारी केली आणि याहवेह त्यांच्याबरोबर होते.

  17. जेव्हा योसेफाच्या घराण्याने बेथेल नगरीची (ज्याला पूर्वी लूज असे म्हणत) हेरगिरी करण्यासाठी पुरुष पाठविले,

  18. एका मनुष्याला शहरातून बाहेर येताना हेरांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “नगरात कसे जायचे ते आम्हाला दाखव आणि आम्ही पाहू की तुझ्याशी चांगले वागले जाईल.”

  19. म्हणून त्याने त्यांना दाखविले आणि त्यांनी तलवारीच्या बळावर पूर्ण शहर नष्ट केले, परंतु त्या मनुष्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाचविले.

  20. त्यानंतर तो हिथी लोकांच्या देशात गेला, तिथे त्याने एक शहर निर्माण केले आणि त्याचे नाव लूज ठेवले, जे नाव आजपर्यंत आहे.

  21. परंतु मनश्शेहने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम किंवा मगिद्दो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना घालविले नाही, कारण कनानी लोकांनी त्या देशात राहण्याचा निश्चय केला होता.

  22. जेव्हा इस्राएली प्रबळ झाले, त्यांनी कनानी लोकांना गुलाम म्हणून काम करण्यास लावले, परंतु त्यांना कधीही पूर्णपणे हाकलून दिले नाही.

  23. तसेच एफ्राईमने गेजेर येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून दिले नाही, परंतु कनानी लोक त्यांच्यामध्येच राहिले.

  24. जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले.

  25. आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही.