मुख्य मजकुरावर जा

The Canaanites बद्दल बायबलमधील वचने: Called to dwell amongst

5 वचने · 30 पैलू

Called to dwell amongst बद्दल वचने

  1. याहवेहने अब्रामाला सांगितले होते, “तू आपला देश, आपले लोक व आपल्या पित्याचे घर सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.

  2. “मी तुला एक मोठे राष्ट्र करेन, मी तुला आशीर्वाद देईन; आणि तुझे नाव महान करेन आणि तू एक आशीर्वाद असा होशील.

  3. जे तुला आशीर्वाद देतील, त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील, त्यांना मी शाप देईन; आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”

  4. याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता.

  5. अब्राम आपल्याबरोबर आपली पत्नी साराय, त्याचा पुतण्या लोट, तसेच आपली धनदौलत म्हणजे हारानात मिळालेली गुरे व लोक घेऊन निघाला आणि कनान देशात पोहोचला.