मुख्य मजकुरावर जा

The Canaanites बद्दल बायबलमधील वचने

62 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आशेरी लोक त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते, कारण त्यांनी त्यांना हाकलून दिले नाही.

  2. नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले.

  3. अमोरी लोकांनी दान गोत्राच्या लोकांना डोंगराळ प्रदेशात पळवून लावले, त्यांना खाली खोर्‍यात येऊ दिले नाही.

  4. आणि अमोरी लोकांनी हेरेस, अय्यालोन आणि शालब्बीम पर्वतावर देखील थांबण्याचा निर्धार केला होता, परंतु जेव्हा योसेफाच्या गोत्रांचे लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांच्यावर देखील जबरदस्तीने मजुरकामासाठी दबाव टाकण्यात आला.

  5. अमोरी लोकांची सीमा अक्राब्बीमच्या चढावापासून सेला आणि त्यापलीकडे होती.

  6. कनानमधील युद्धांमध्ये भाग न घेतलेल्या इस्राएली लोकांची परीक्षा घेण्यासाठी याहवेहने या राष्ट्रांना त्या देशात राहण्याची परवानगी दिली

  7. (हे केवळ यासाठी की ज्यांना युद्धाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता, त्या इस्राएली लोकांच्या वंशजांना हा अनुभव यावा):

  8. ते लोक हे होते, पलिष्टांचे पाच शासक, कनानी, सीदोनी, व बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी.

  9. याहवेहने मोशेद्वारे त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञांचे पालन ते करतील की नाही याबाबत परीक्षा पाहण्यासाठी इस्राएली लोकांना मागे राहू दिले होते.

  10. त्यांनी त्यांच्या मूर्तींची आराधना केली, त्यामुळे ते पाशात अडकले.

  11. त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.

  12. निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.