मुख्य मजकुरावर जा

The Amalekites बद्दल बायबलमधील वचने

78 वचने · 31 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”

  2. शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.

  3. आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.”

  4. परंतु शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही. तू याहवेहच्या वचनाचा धिक्कार केला आहे आणि याहवेहनेही तुला इस्राएलचा राजा म्हणून धिक्कारले आहे.”

  5. नंतर शमुवेल म्हणाला, “अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्याकडे घेऊन या.” अगाग साखळ्यांनी बांधलेला असा शमुवेलकडे आला आणि त्याला वाटले, “मरणाचे संकट खात्रीने टळले आहे.”

  6. परंतु शमुवेलने म्हटले, “जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले, तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले.

  7. नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.)

  8. जेव्हा दावीद कोणत्याही प्रांतावर हल्ला करीत असे तो एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत सोडत नसे, परंतु तेथील मेंढरे, गुरे, गाढवे व उंट आणि वस्त्रे यांची लूट घेत असे. नंतर तो आखीशकडे परत आला.

  9. कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही किंवा अमालेकी लोकांविरुद्ध याहवेहचा क्रोध उगारला नाही, म्हणून याहवेहने आज हे तुझ्यासाठी केले आहे.

  10. तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,

  11. आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.

  12. त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.

  13. रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली;

  14. त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते.

  15. दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?” त्याने उत्तर दिले, “मी इजिप्त देशाचा असून अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपासून मी आजारी असल्यामुळे माझ्या धन्याने मला सोडून दिले.

  16. आम्ही नेगेवातील करेथी प्रांत, यहूदीयाचा काही प्रांत आणि कालेबाचा नेगेव यावर छापा टाकला आणि सिकलाग जाळून टाकले.”

  17. दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?” तो म्हणाला, “तुम्ही मला मारून टाकणार नाही किंवा मला माझ्या धन्याच्या स्वाधीन करणार नाही, अशी परमेश्वरापुढे शपथ घ्या, मग मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन.”

  18. मग त्याने दावीदाला तिथे नेले, तेव्हा पाहा, ते त्या भागात सर्वत्र पसरले होते. खात, पीत व मौजमजा करीत होते, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या व यहूदीयाच्या देशातून मोठी लूट आणली होती.

  19. दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही.

  20. दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले.

  21. लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले.

  22. त्याने सर्व मेंढरे व गुरे घेतली, आणि त्याच्या माणसांनी ती इतर पशूंच्या पुढे हाकीत नेत म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”

  23. दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही:

  24. अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.

  25. ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.