Skip to content

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे

  2. यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’

  3. “अशा रीतीने, महाराज अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले.

  4. तर मी प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि यहूदीया प्रांतातील लोकांना व गैरयहूदी लोकांना असा प्रचार केला की त्या सर्वांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळावे व पश्चात्तापास योग्य अशी फळे द्यावी.

  5. या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

  6. परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला साहाय्य केले; म्हणूनच प्रत्येक लहानथोरास या गोष्टींची साक्ष सांगण्यास मी येथे उभा आहे व ज्यागोष्टी घडतील असे संदेष्टे व मोशे यांनी सांगितले होते, त्यापलीकडे मी दुसरे काहीही सांगितले नाही.

  7. त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील.”

  8. हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.”

  9. परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे.

  10. महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कुठे जगाच्या कानाकोपर्‍यात घडलेल्या नाहीत.

  11. अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.”

  12. अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”

  13. पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”

  14. तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले.

  15. आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले, “या मनुष्याला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.”

  16. अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.”

  17. जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्‍या झांजेसारखा आहे.

  18. मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.

  19. माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.

  20. प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही.

  21. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.

  22. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते.

  23. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.

  24. भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील.

  25. कारण आपल्याला थोडेच कळते, आपल्याला संकल्पाचेही ज्ञान थोडे आहे.