मुख्य मजकुरावर जा

Reubenites बद्दल बायबलमधील वचने

74 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.”

  2. तेव्हा ते यहोशुआला म्हणाले, “जी आज्ञा तू आम्हाला दिली आहेस त्याप्रमाणे आम्ही करू आणि जिथे कुठे तू आम्हाला पाठवशील तिथे आम्ही जाऊ.

  3. जसे आम्ही मोशेच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले, तसेच आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. फक्त एवढेच की तुझे परमेश्वर याहवेह तुझ्याबरोबर असावे जसे ते मोशेबरोबर होते.

  4. जो कोणी तुझ्या शब्दाविरुद्ध बंड करेल आणि त्याचे पालन करणार नाही, त्याला मरणदंड दिला जाईल. फक्त खंबीर हो आणि धैर्यवान हो!”

  5. रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:

  6. आर्णोन खोर्‍यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्‍यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,

  7. हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे,

  8. याहसाह, केदेमोथ, मेफाथ,

  9. किर्याथाईम, सिबमाह, खोर्‍यातील टेकडीवरील जेरेथ-नगर.

  10. बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ.

  11. पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.

  12. या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते.

  13. यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.

  14. तथापि लेवी वंशास तुमच्यामध्ये भाग मिळणार नाही, कारण याहवेहची याजकीय सेवा हेच त्यांचे वतन आहे. गाद, रऊबेन आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला आधी त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेकडे मिळाले आहे. याहवेहचे सेवक मोशेने ते त्यांना दिले आहे.”

  15. नंतर यहोशुआने रऊबेन, गाद व मनश्शेहचे अर्धे गोत्र यांना बोलाविले

  16. आणि त्यांना म्हटले, “याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही केले आहे आणि मी दिलेली प्रत्येक आज्ञा तुम्ही पाळली आहे.

  17. कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे.

  18. आता याहवेह तुमच्या परमेश्वरांनी अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा दिला आहे. तर आता यार्देनेच्या पलीकडे याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या प्रदेशातील तुमच्या घरी तुम्ही परत जा.

  19. परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”

  20. तेव्हा यहोशुआने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांच्या घरी रवाना झाले.

  21. जेव्हा ते कनान देशातील यार्देन जवळील गलीलोथ येथे आले तेव्हा रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी यार्देनजवळ एक खूप मोठी वेदी बांधली.

  22. आणि त्यांनी कनान देशाच्या सीमेवर यार्देन नदीजवळ जी इस्राएली लोकांची बाजू होती त्या गलीलोथ येथे रऊबेन, गाद आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांनी मोठी वेदी बांधली आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले,

  23. तेव्हा सर्व इस्राएली मंडळी त्यांच्याशी युद्ध करावयाला शिलोह येथे एकत्र जमले.

  24. म्हणून इस्राएली लोकांनी एलअज़ार याजकाचा पुत्र फिनहासला गिलआदाच्या प्रदेशाकडे रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडे पाठविले.

  25. त्याच्याबरोबर त्यांनी इस्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून एक, जे इस्राएलच्या कुळांपैकी आपआपल्या पूर्वजांच्या दहा कुटुंबप्रमुख पुरुषांना पाठविले.