मुख्य मजकुरावर जा

Regeneration बद्दल बायबलमधील वचने

256 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आत्मिक असलेल्या मनुष्याला प्रत्येक गोष्ट पारखता येते, परंतु तो स्वतः मात्र कोणत्याही मानवी न्यायाखाली नसतो.

  2. कारण, “प्रभूचे मन कोण जाणू शकेल? त्यांचा सल्लागार कोण आहे?” आपल्याकडे तर ख्रिस्ताचे मन आहे.

  3. मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले.

  4. पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.

  5. आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.

  6. तुमच्यापैकी काहीजण अशा प्रकारचे होते, पण आता तुम्हाला धुऊन स्वच्छ करून पवित्र केलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला नीतिमान केले आहे.

  7. कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.

  8. काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे.

  9. आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले.

  10. आता हेच परमेश्वर जे तुम्हाला व आम्हाला असे आपणा दोघांना ख्रिस्तामध्ये स्थिर करतात. त्यांनी आमचा अभिषेक केला आहे,

  11. त्यांच्या मालकीहक्काचा शिक्का आमच्यावर मारला आहे आणि आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा ठेव म्हणून ठेवला आहे, जे येणार आहे त्याची हमी देत आहे.

  12. तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.

  13. आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.

  14. कारण, “अंधकारातून प्रकाश हो,” असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात दिला आहे.

  15. ज्याने आम्हाला या उद्देशासाठीच सिद्ध केले आहे तो परमेश्वर आहे आणि अमानत म्हणून आम्हाला पवित्र आत्मा विसार म्हणून दिला आहे.

  16. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.

  17. मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले.

  18. त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

  19. सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्त्व नाही; नवी उत्पत्ती हेच महत्त्वाचे आहे.

  20. तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.

  21. आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.

  22. आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे.

  23. कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे,

  24. कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.

  25. तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे.