Skip to content

Peter बद्दल बायबलमधील वचने

292 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  2. पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

  3. पेत्र कबरेजवळ धावत गेला व त्याने आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाच्या पट्ट्या पडलेल्या दिसल्या, तेव्हा काय घडले असावे याविषयी तो आश्चर्य करीत परत गेला.

  4. जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”

  5. मग तो त्याला येशूंकडे घेऊन आला. येशूंनी त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा, म्हणजे खडक असे म्हणतील.” भाषांतर केल्यानंतर पेत्र.

  6. त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.

  7. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.”

  8. शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.”

  9. त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.”

  10. येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील!

  11. शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला.

  12. मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.”

  13. थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.

  14. दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”

  15. परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?”

  16. पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.

  17. तेव्हा धावतच ती शिमोन पेत्र व दुसरा शिष्य, ज्यावर येशूंची प्रीती होती, त्यांना येऊन म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आहे आणि त्यांना कुठे ठेवले आहे ते आम्हाला माहीत नाही!”

  18. मग पेत्र आणि दुसरा शिष्य कबरेकडे निघाले.

  19. दोघेही धावत होते, परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापुढे धावत गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला.

  20. त्याने डोकावून आत पाहिले, तेव्हा तिथे त्याने तागाच्या पट्ट्या पडलेल्या पाहिल्या, परंतु तो आत गेला नाही.

  21. एवढ्यात शिमोन पेत्र त्याच्यामागून आला आणि सरळ कबरेच्या आत गेला. त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली,

  22. त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्‍यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले:

  23. शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा, गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते.

  24. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास बाहेर जात आहे,” तेव्हा ते पेत्राला म्हणाले, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते बाहेर निघून होडीत बसले, परंतु त्या रात्री ते काहीही धरू शकले नाही.

  25. पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही.