Skip to content

Peter बद्दल बायबलमधील वचने

292 वचने · 35 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते.

  2. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”

  3. लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.

  4. सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले.

  5. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले.

  6. शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले.

  7. ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!”

  8. त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले),

  9. “परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”

  10. पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”

  11. पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.”

  12. “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  13. परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले.

  14. पण तेवढ्यात जे उभे होते त्यांच्यातील एकाने तरवार उपसून महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा कान कापून टाकला.

  15. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकर्‍यांसोबत जाऊन बसला आणि शेकोटीजवळ ऊब घेत बसला.

  16. हे सर्व होत असताना, पेत्र खाली अंगणातच होता, तिथे महायाजकाची एक दासी आली.

  17. तिने पेत्राला शेकोटीसमोर शेकताना पाहिले, तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. “तू नासरेथकर येशूंबरोबर होतास.”

  18. पण पेत्र नकार देत म्हणाला, “तू कशासंबंधी बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो द्वाराकडे गेला.

  19. त्याला तिथे उभे असलेल्या दासीने पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली, “हा मनुष्य त्यांच्यापैकी एक आहे!”

  20. पेत्राने ते पुन्हा नाकारले. थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती. त्यातील काहीजण पेत्राला म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालील प्रांताचा आहेस!”

  21. हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्या मनुष्याला मी ओळखत सुद्धा नाही.”

  22. तेवढ्यात कोंबडा दुसर्‍या वेळेला आरवला. त्याबरोबर पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” तेव्हा पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.

  23. पण जा, ही बातमी त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रालाही सांगा, ‘ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. जसे त्यांनी तुम्हाला सांगितले होते तसे ते तिथे तुम्हाला भेटतील.’ ”

  24. येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले.

  25. एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.