मुख्य मजकुरावर जा

Peter बद्दल बायबलमधील वचने: His perfidy foretold by Jesus, and his profession of fidelity

13 वचने · 35 पैलू

His perfidy foretold by Jesus, and his profession of fidelity बद्दल वचने

  1. यावर पेत्राने त्यांना म्हटले, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.”

  2. येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  3. परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले.

  4. पेत्र जाहीरपणे म्हणाला, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही.”

  5. “पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज; होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  6. परंतु पेत्र ठामपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व असेच म्हणाले.

  7. “शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे.

  8. परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”

  9. शिमोन म्हणाला, “प्रभूजी, आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व जीव देण्याचीही माझी तयारी आहे.”

  10. तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “पेत्रा, मी तुला निश्चित सांगतो, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  11. शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.”

  12. त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.”

  13. येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील!