Skip to content

Parables बद्दल बायबलमधील वचने

452 वचने · 74 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग त्याने शेत नांगरून तयार केले, तर तो त्यात शहाजिरे व जिऱ्याची पेरणी करत नाही काय? तो गव्हाच्या ठिकाणी गहू आणि जव सरीने लावत नाही का? आणि ज्वारीच्या वाफ्यात ज्वारी पेरत नाही का?

  2. त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात आणि त्याला योग्य रीत शिकवितात.

  3. शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही, किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही; शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो, आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो.

  4. भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते; म्हणून त्याची सतत मळणी करत नाहीत. ते खळ्यात घालून त्यावर मळणीच्या गाडीची चाके फिरविली जातात, पण त्याची मळणी करण्यासाठी घोड्याचा वापर करत नाहीत.

  5. ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.

  6. “त्यांना सांग: ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या.’ यावर ते जर तुला म्हणतील, ‘सर्व बुधल्या द्राक्षारसाने भरलेल्या असाव्या हे आम्हाला माहीत नाही काय?’

  7. मग त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: या देशातील सर्व रहिवाशांना, अगदी दावीदाच्या राजासनावर बसणारा राजा, याजक व संदेष्टे यांच्यापासून ते सर्व यरुशलेमनिवासी यांना मी मदिरेने झिंगून टाकणार आहे.

  8. ते सर्व एकमेकांना विरोध करतील, आईपिता व मुलेदेखील एकमेकांना चिरडतील असे मी करेन, त्यांचा सर्वनाश होईल. मी त्यांची मुळीच गय करणार नाही व त्यांना दयामाया दाखविणार नाही, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

  9. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  10. “मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे?

  11. काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय?

  12. आणि जेव्हा तिला अग्नीत टाकले जाते व तिचे दोन्ही टोक जळून जातात आणि मधला भाग भस्म होतो, तेव्हा ते कोणत्या कामास योग्य असतात?

  13. ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?

  14. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्‍या लोकांशी मी वागेन.

  15. मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  16. ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  17. “ ‘त्याने देशातील एक रोप घेतले आणि ते सुपीक भूमीत लावले. त्याने ते वाळुंजीप्रमाणे भरपूर पाण्याजवळ लावले,

  18. आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.

  19. “ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.

  20. त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’

  21. “त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.

  22. तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”

  23. “इस्राएलच्या राजपुत्रांसाठी विलाप कर

  24. आणि म्हण: “ ‘तुझी आई सिंहांमध्ये सिंहीण होती! ती त्यांच्यामध्ये वसत होती आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.

  25. तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले, आणि तो एक बलवान सिंह झाला. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.