मुख्य मजकुरावर जा

Medo-Persian Kingdom बद्दल बायबलमधील वचने

62 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अहश्वेरोश राजाच्या शयनमंदिरात नेण्यापुर्वी प्रत्येकीवर बारा महिने सौंदर्यप्रसाधनांचे उपचार करण्यात येत, सहा महिने गंधरसाच्या तेलाचा उपचार व सहा महिने खास सुवासिक द्रव्ये व प्रसाधनांचा उपचार केला जाई.

  2. मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती.

  3. आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही.

  4. राजा हामानाला म्हणाला, “पैसे तुझ्याजवळच ठेव व या लोकांचे तुला योग्य वाटेल तसे कर.”

  5. “राजाच्या सर्व अधिकाऱ्यांना व शाही प्रांतातील लोकांना माहीत आहे की एखादी व्यक्ती, मग ती पुरुष असो वा स्त्री, राजाच्या आतील चौकात बोलाविल्यावाचून गेली, तर त्यांच्यासाठी एकच कायदा आहे: त्यांना प्राणदंड देण्यात यावा. पण जर राजाने आपला सोन्याचा राजदंड त्यांच्यापुढे केला तरच त्यांना जीवदान मिळते. आता तीस दिवस होऊन गेले आहे, पण राजाने मला आपल्याकडे बोलावलेले नाही.”

  6. “जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”

  7. जेव्हा त्याने एस्तेर राणी अंगणात उभी आहे असे पाहिले, तिला बघून तो प्रसन्न झाला, तेव्हा त्याने आपला सोन्याचा राजदंड तिच्या दिशेने पुढे करून तिचे स्वागत केले, म्हणून एस्तेर जवळ गेली आणि तिने राजदंडाच्या टोकास स्पर्श केला.

  8. मग राजाच्या खोजापैकी हरबोना नावाचा सेवक म्हणाला, “महाराज, पन्नास हात उंचीचा खांब हामानाच्या घराजवळ उभा करण्यात आला आहे. राजाला मदत करण्यासाठी ज्या मर्दखयाने सूचना दिली होती, त्याला फाशी देण्यासाठी याने तो तयार करवून घेतलेला आहे.” तेव्हा राजा म्हणाला, “त्यावर यालाच फाशी द्या!”

  9. अशा रीतीने संदेशवाहकांनी शाही वेगवान घोड्यांवर स्वार होऊन व राजाज्ञेनुसार राज्यात सर्वत्र पत्र नेले. हे फर्मान शूशन राजवाड्यात काढण्यात आले.

  10. जेव्हा मर्दखया राजाच्या उपस्थितीतून बाहेर गेला, तेव्हा त्याने निळ्या व पांढर्‍या रंगांची राजकीय वस्त्रे परिधान केले होते व डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून आणि व जांभळ्या रंगाचा व तलम वस्त्राचा झगा घातला होता. आणि शूशन शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

  11. समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी: ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते, त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून, दहशती भूमीमधून येतो.

  12. एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे: देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो. हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला! तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.

  13. कोरेशविषयी जो म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे तेव्हा तो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल; तो यरुशलेमविषयी म्हणेल, “त्याची पुनर्बांधणी होवो,” आणि मंदिराविषयी म्हणेल, “त्याचा पाया बांधण्यात येवो.” ’

  14. “त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, कोरेशने अनेक देश जिंकावे आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. मी त्याच्यासाठी दारे उघडेन; यापुढे या वेशी बंद होणार नाहीत:

  15. हे कोरेशा, मी तुझ्यापुढे चालेन, मी पर्वत जमीनदोस्त करेन आणि कास्याच्या वेशी तोडेन व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन.

  16. दडवून ठेवलेली भांडारे, गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन, जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा, याहवेह इस्राएलचा परमेश्वर मीच आहे हे तुला समजेल.

  17. माझा सेवक याकोबासाठी, माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी, तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले.

  18. “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली. त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून तुला वैभवी बनविले.

  19. पर्शिया, कूश आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील.

  20. त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या,

  21. “तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.

  22. परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले.

  23. “फारसीन: आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.”

  24. आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.

  25. दारयावेश राजाने आपल्या मर्जीनुसार आपल्या संपूर्ण साम्राज्यात राज्य करण्यासाठी 120 प्रांताधिकारी नियुक्त करावे,